गुजरातमध्ये विकसित होणार आशिया खंडातील सर्वात मोठे युद्धनौका तोडण्याचे यार्ड

0
297

आशिया खंडातील सर्वात मोठे जहाज तोडण्याचे यार्ड तयार करण्याचा निर्णय जहाजबांधणी मंत्रालयाने घेतला असून गुजरातमधील अलंग येथे हे पर्यावरणस्नेही यार्ड तयार करण्यात येणार आहे.

 यासाठी २१५ कोटींचा फेरस फंड गुजरात मॅरीटाईम बोर्ड (जीएमबी) आणि अलंग शिप रिसायकलिंग यार्ड असोसिएशन यांच्या सहकार्यातून उभा केला जाणार आहे. त्यातून यार्ड विकसित केले जाणार आहे.युद्धनौका तोडण्यासाठी सुविधा जगात कुठेही नसल्याने अलंग येथे प्रचंड व्यवसायाची संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले की, तिथे १०० हून अधिक नौका या तोडण्याच्या कामासाठी प्रतिक्षेसाठी असतात. त्यामुळे अलंग हे त्यासाठी उत्तम ठिकाण असणार आहे. हा व्यवसाय कल्पनेपलीकडचा असणार असल्याचे त्यांनी म्हटले. फेरस फंडातून रस्ते, अग्नीशमनासाठी पाईपलाईन इत्यादी कामे केली जाणार आहेत. डिजीटल सुरक्षेचे कॅमेरे हे यार्डमध्ये बसविली जाणार आहेत.