गुगल असिस्टंट आता मराठीत

0
446

गुगलचा ‘गुगल फॉर इंडिया’ हा कार्यक्रम आज दिल्लीत पार पडला. गुगल असिस्टंट आता मराठीसह अन्य सात भाषांमध्ये उपलब्ध होणार असल्याची घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली. गुगल असिस्टंट सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

‘गुगल फॉर इंडिया’ या कार्यक्रमात गुगलच्या आगामी विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मराठी गुगल असिस्टंटचा समावेश आहे. त्यामुळे गुगल असिस्टंटला आता मराठीतही प्रश्न विचारणे शक्य होणार आहे.

गुगलचे पेमेंट अॅप ‘गुगल तेज’चं नाव बदलून ‘गुगल पे’ करण्यात आलं आहे. तसेच या अॅपच्या फिचर्समध्येही काही बदल करण्यात आलेले नाही आहेत. याशिवाय गुगल युजर्सना कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी गुगलची बँकांसोबत चर्चा सुरू आली. त्यामुळे गुगल पे युजर्सना सहजपणे कर्ज उपलब्ध होणार आहे आणि कर्जाची रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे.

‘गुगल मॅप्स’मध्ये कंपनीने टॅर्न-बाय-टर्न हे फिचर अॅड केलं आहे. तसेच गुगलने रेडबससोबत करार केला आहे. त्यामुळे वाहतुकीची माहिती मॅपवर उपवब्ध होणार आहे. याशिवाय ‘गुगल मॅप्स गो’वर तिकीटांची किंमत आणि बसचं वेळापत्रक गुगल यूजर्सना उपलब्ध होणार आहे.