गिर सिंहाच्या संरक्षणासाठी गुजरात सरकारने सखोल प्रकल्प सुरू केला

0
245

20 नोव्हेंबर 2018 रोजी गुजरात सरकारने गिर सिंहांच्या संरक्षणासाठी 351 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू केला. कॅनाइन डिस्टेम्पर व्हायरस (CDV) च्या प्रकोपमुळे ज्यात 23 आशियाई सिंह मेले होते त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

आशियाई सिंह मात्र सौराष्ट्र मधील गिर राष्ट्रीय उद्यानात आढळतात.
या सखोल प्रकल्पात 108 आपत्कालीन सेवांसारख्या आपत्कालीन अॅम्बुलन्स व्हॅनचाही समावेश असेल.
गिरच्या सभोवतालच्या 10 किलोमीटरच्या इको-सेन्सेटिव्ह झोनशी संबंधित पर्यावरणविषयक समस्यांमुळे गुजरात सरकारने गिर क्षेत्रातील 10 खाणींना देण्यात येणारी मान्यता सद्या स्थगित केली आहे. वन्यजीव तज्ञ आणि वन अधिकारी बऱ्याच वर्षांपासून तक्रार करीत आहेत की अभयारण्य जवळील खाणकाम आणि व्यावसायिक प्रकल्पांमुळे या जंगली प्राण्यांच्या शांत अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे.

संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञान
सरकारने सांगितले की गिर सिंहाच्या संरक्षणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. सिंह आणि इतर रात्री प्राण्यांच्या हालचाली CCTV आणि कॅमेरा-आरोहित ड्रोनद्वारे त्यांच्यावर नजर ठेवली जाईल. कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात यशस्वी झालेला E-eye प्रकल्प इथे सुद्धा वापरण्यात येईल.

E-eye
• E-eye हे 24/7 आणि सगळ्या ऋतुंमध्ये कार्य करणारे मोठ्या पायावरचे बुद्धीमान तंत्रज्ञान आहे, जे असुरक्षित भागात आणि अभयारण्य परिमितींमध्ये थेट वन्यजीव पर्यवेक्षण प्रदान करण्यास सक्षम आहे, वन्यजीव गुन्हा व्हायच्या आधीच त्याची खबर सुद्धा हे देण्यास सक्षम आहे.
• E-eye यंत्रणा दुर्लभ विभागाचे निरीक्षण, गस्त व्यवस्थापित करणे, घुसखोर शोधणे आणि रेंजर्सन सतर्क ठेवून त्या प्रदेशाला सुरक्षित ठेवण्यास मदत करते. हे व्यवस्थापकांना वन्यजीवन अभ्यासास मदत करते.
• सरकारने पाच सफारी पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, एक सिंह सफारी गांधीनगर येथे, एक वाघ सफारी केवडिया येथे सरदार पटेल यांच्या एकता प्रतिमेजवळ, सुरत जिल्ह्यात मांडवी येथे आणि दक्षिण गुजरात मध्ये डांग येथे दोन बिबटा सफारी पार्क उभारण्यात येतील.