गांधी शांती पुरस्कार 2015, 2016, 2017 आणि 2018 जाहीर करण्यात आले

0
455

वर्ष 2015, 2016, 2017 आणि 2018 साठी गांधी शांती पुरस्कार 16 जानेवारी 2019 रोजी केंद्रीय मंत्रालयाने जाहीर केले आहेत.

• 2018 गांधी शांती पुरस्कार योहे सासाकावा यांना देण्यात आला आहे, जो अनेक परोपकारी पुढाकारांच्या अग्रस्थानी आहेत. भारतातील कुष्ठरोग निर्मूलनासाठी त्यांनी ज्या प्रकारे काम केले ते लक्षात घेता त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

पुरस्कार विजेते

2015 – विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी
2016 – अक्षय पात्र फाऊंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल
2017 – एकल अभियान ट्रस्ट
2018 – योहे सासाकावा

• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील ज्यूरीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.

• या ज्यूरीमध्ये भारताचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खडगे आणि संसदेचे अनुभवी सदस्य एल. के. अडवाणी हे होते.

• जानेवारी 16, 2019 रोजी तपशीलवार चर्चा झाल्यानंतर ज्युरी सदस्यांनी सर्वसमावेशकपणे निर्णय घेतला.

गांधी शांती पुरस्कार :

• गांधी शांती पुरस्कार 1995 मध्ये महात्मा गांधींच्या 125 व्या जयंतीच्या प्रसंगी सुरू करण्यात आला.
• अहिंसा आणि इतर गांधीवादी पद्धतींद्वारे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनांसाठी त्यांच्या योगदानांसाठी व्यक्ती आणि संस्थांना हा वार्षिक पुरस्कार देण्यात येतो.
• या पुरस्काराचे स्वरूप 1 कोटी रुपये, एक उद्धरण आणि प्लॅक तसेच पारंपारिक हस्तकला / हँडलूम वस्तू असे आहे.
• पंतप्रधानांच्या अध्यक्षपदाखाली प्रत्येक वर्षासाठी पुरस्कार एक ज्युरीद्वारे निवडला जातो.
• 1995 मध्ये टांझानियाचे माजी राष्ट्राध्यक्ष ज्युलियस के न्येरेरे यांना प्रथम पुरस्कार मिळाला.