क्लॅडनो मेमोरियल अॅथलेटिक्स मीट – मोहम्मद अनास आणि हिमा दास दोघांनी सुवर्णपदक जिंकले

0
12

चेक प्रजासत्ताकमधील क्लॅडनो येथे क्लॅडनो मेमोरियल अॅथलेटिक्स मीट मध्ये भारताच्या मोहम्मद अनासने 45.21 सेकंदाच्या वेळात पुरुषांच्या 400 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि हिमा दासने महिलांच्या 200 मीटर स्पर्धेत सुवर्ण जिंकले. हिमा दास चे मागच्या 11 दिवसांत हे तिसरे विक्रम आहे.

मुख्य वैशिष्ट्ये :

मोहम्मद अनास – पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत त्याने स्वत: चा राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याच्या आधीच्या राष्ट्रीय रेकॉर्डचा वेळ 45.24 सेकंदावर होता जो त्याने 2018 मध्ये नोंदवला होता. 24 वर्षीय अनासने आपली रेस पोलंडच्या रौप्यपदक विजेता ओमेल्को राफल (46.19) याच्यापेक्षा एक सेकंद आधी पूर्ण केली.
हिमा दास – तिने महिलांच्या 200 मीटर शर्यतीत 23.43 सेकंदात सुवर्णपदक मिळवले तरी तिची सर्वोत्तम वैयक्तिक कामगीरी 23.10 सेकंदाची आहे. 2 आठवड्यांच्या आत तिचे हे तिसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे. तिने पोलंडमधील पॉझ्नन अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स आणि पोलंडमधील कुत्नो एथलेटिक्स मीटमध्ये दोन सुवर्णपदक जिंकले.
व्ही के विस्मया – महिलांच्या 400 मी मध्ये ‘ए’ रेस जिंकण्यासाठी तिने 52.54 सेकंदात वैयक्तिक कामगिरी केली.

इतर विजेते :

• पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत भारतीय खेळाडू विपिन कसाना (82.51 मीटर), अभिषेक सिंग (77.32 मी) आणि दाविंदर सिंग कांग (76.58 मी) यांनी प्रथम 3 स्थान पटकावले.
• पुरुष गोळा फेक स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम धारक तेजिंदर पाल सिंग तोर याने 20.36 मीटर सोबत कांस्य पदक मिळविले. त्याचा राष्ट्रीय विक्रम 20.75 मीटरचा आहे.

इतर सुवर्णपदक विजेते :

• अर्चना 100 मीटर (11.74 सेकंद)
• हर्ष कुमार 400 मीटर (46.76 सेकंद)
• 1500 मीटर मध्ये लिली दास (4:19.05)
• साहिल सिल्वाल भालाफेक मध्ये (78.50 मीटर)
• महिला 4×100 रिले (45.81 सेकंद).

• किर्गीझस्तानमधील बिश्केक येथे XXII आंतरराष्ट्रीय मेमोरियल स्पर्धेत – भारतीयांनी 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्यपदक पटकावले. राष्ट्रीय विक्रमाधारक एम. श्रीशंकर याने 7.97 मी इतकी लांब उडी मारली.