क्रिस गेलने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सेवानिवृत्तीची घोषणा केली

0
221

वेस्ट इंडीजच्या फलंदाज क्रिस गेलने इंग्लंड व वेल्समधील या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेनंतर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यापासून निवृत्ती जाहीर केली आहे. ही घोषणा 17 फेब्रुवारी 2019 रोजी वेस्टइंडीज क्रिकेटने केली होती.

• 39 वर्षीय डावखुरा फलंदाज गेल याने 284 एकदिवसीय सामन्यात एकूण 9,727 धावा काढल्या आहेत. वेस्ट इंडीजच्या ब्रायन लारानंतर गेल दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर यायला गेलला अजून 677 धावांची गरज आहे. 2019 विश्वचषकदरम्यान तो साध्य होण्याची अपेक्षा करेल.
• जुलै 2018 नंतर तो आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंडविरुद्ध 20 फेब्रुवारीला खेळणार आहे.

क्रिस गेल :

• क्रिस्तोफर गेल हा जमैकन क्रिकेटपटू आहे जो वेस्टइंडीजसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.
• त्याने जमैकाच्या किंग्सटन मधील प्रसिद्ध लुकास क्रिकेट क्लबसह क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली.
• गेलने सप्टेंबर 1999 मध्ये वन डे इंटरनॅशनलमध्ये पदार्पण केले आणि मार्च 2000 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले. त्यानंतर 2007 ते 2010 या कालावधीत वेस्टइंडीजचा कसोटी संघाचे नेतृत्व केले.
• त्याने न्यूझीलंडविरुद्ध फेब्रुवारी 2006 मध्ये टी-20 पदार्पण केले.

गेलचे काही महत्त्वाचे विक्रम :

• 1999 मध्ये पदार्पण केल्यापासून गेलने 23 एकदिवसीय शतक नोंदविले आहेत. टी -20 क्रिकेटमधील सर्वात महान लंदाजांपैकी एक मानला जाणारा, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन फॉर्मेटमध्ये शतक झळकावणारा पहिला फलंदाज आहे.
• 2002 मध्ये, त्याने एका कॅलेंडर वर्षात 1000 पेक्षा जास्त धावा करून विवियन रिचर्ड्स आणि ब्रायन लारा नंतर असा तिसरा वेस्ट इंडियन बनला.
• वन डे इंटरनॅशनल इतिहासात 150 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या 6 खेळाडूंपैकी तो एक आहे.
• टेस्टमध्ये दोनदा तिहेरी शतक झळकावणारा मात्र चार खेळाडूंपैकी एक आहे. ज्यामध्ये 2005 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध 317 आणि श्रीलंकेविरुद्ध 2010 मध्ये 333 धावांचा समावेश आहे.
• 2015 च्या विश्वचषक दरम्यान झिम्बाब्वेविरुद्ध 138 चेंडूत 200 धावा केल्या तेव्हा तो विश्वचषक इतिहासात दुहेरी शतक झळकावणारा पहिला फलंदाज बनला.
• त्याने या सामन्यात 215 धावा केल्या, जो विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम होता. परंतु न्यूझीलंडच्या मार्टिन गपटिलने वेस्टइंडीजविरुद्ध खेळतांना हा विक्रम तोडला.
• मार्च 2016 मध्ये गेल न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्कुलमनंतर इंग्लंडविरुद्ध 100 धावांवर नाबाद असतांना दोनदा T-20 आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा दुसरा खेळाडू बनला.