कोरियन ओपनच विजेतेपद सिंधुकडे

0
18

जपानच्या नोझोमी ओकुहारा हिचा पराभव करत पी.व्ही सिंधूने कोरिअन ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. ही स्पर्धा जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिन्टनपटू ठरली आहे.

कोरिया सुपर सीरिजचे जेतेपद भारताची शटलक्वीन पी.व्ही सिंधूने पटकावले आहे. सिंधूने अंतिम सामन्याच्या थरारक लढाईत जपानच्या नोझुमी ओकुहाराचा पराभव केला

23 मिनीट चाललेल्या या सामन्यात सिंधू 22-20 ,11-21,21-18 असा पराभव केला. फायनलची ही लढत अत्यंत चुरसीची झाली. याआधी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नोकोहाराने सिंधूचा फायनलमध्ये पराभव केला होता.सिंधूने यावर्षी ऑलिंम्पिकमध्येही रौप्यपदक मिळवलं होतं. कोरिअन ओपन ही तिने यावर्षी जिंकलेली दुसरी सुपर सिरीज आहे. ही स्पर्धा जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय बॅडमिन्टनपटू ठरली आहे.