के. पी. ओली नेपाळच्या पंतप्रधानपदी

0
22

नेपाळच्या पंतप्रधानपदी के. पी. शर्मा ओली यांची दुसऱ्यांदा निवड झाली. त्यांनी गुरुवारी पदाची शपथ घेतली. नेपाळमधील संसदेच्या निवडणुकीत ओली यांच्या डाव्या पक्षाच्या आघाडीने ऐतिहासिक विजय मिळविला होता. पूर्वीच्या नक्षलवादी बंडखोरांच्या संघटनेशी त्यांनी युती केली आहे.

# के. पी. शर्मा ओली यांनी गुरुवारी नेपाळचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. सीपीएन माओवादी पक्षासोबतच्या ओली यांच्या डाव्या आघाडीने संसदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर या देशात राजकीय स्थैर्य प्रस्थापित होईल.

# महाराजगंज येथील राष्ट्रपतींच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी ६५ वर्षांचे ओली यांच्यासह सीपीएन- यूएमएलच्या दोन इतर मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

# ओली हे नेपाळचे ४१ वे पंतप्रधान आहेत.

# ओली यांचा सीपीएन- यूएमएल पक्ष २७५ सदस्यांच्या संसदेत १२१ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र माओवादी मंत्र्यांना आजच्या शपथविधी समारंभात सहभागी कार्यास ओली अपयशी ठरल्यामुळे नवे सरकार किती काळासाठी टिकेल याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

# चीनधार्जिण्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे ओली यांनी यापूर्वी ११ ऑक्टोबर २०१५ ते ३ ऑगस्ट २०१६ या कालावधीत देशाचे पंतप्रधानपद भूषवले होते.