केंद्र सरकार करणार २० लाख नोकऱ्यांची भरती

0
15

केंद्र सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २० लाख रिक्त पदे भरणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २० लाख रिक्त पदे भरणार असून त्यातील २ लाखांहून अधिक पदे रेल्वेतील आहेत ती भरण्याची घोषणा आधीच झाली आहे.

देशात वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावरून विरोधकांनी टीका सुरू केल्यामुळे मोदी सरकारने जोरात हालचाली सुरू केल्या असून या मेगाभरतीची सुरुवात केंद्राची विविध खाती व सार्वजनिक क्षेत्रातील २४४ कंपन्यांपासून होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कामगार मंत्रालयाने या मेगाभरतीसाठी पुढाकार घेतला असून कामगार मंत्रालय सध्या विविध खात्यांमध्ये असलेल्या रिकाम्या पदांची माहिती घेत आहे.ती मिळाल्यानंतर नव्या योजनेचा आराखडा तयार केला जाणार असून त्यानंतर दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक तत्त्वावर ही पदे भरण्यात येतील, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाºयाने दिली आहे.

या मेगाभरतीद्वारे सुमारे २० लाख युवकांना रोजगार मिळण्याची शक्यता असून कामगार मंत्रालयाकडून लवकरच सर्व खात्यांकडून तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे.