केंद्रीय माहिती आयोगात मुख्य माहिती आयुक्‍तपदी सुधीर भार्गव

0
1900

सुधीर भार्गव यांची केंद्रीय माहिती आयोगात मुख्य माहिती आयुक्‍तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय चार माहिती आयुक्‍तांचीही नेमणूक करण्यात आली आहे.

सुधीर भार्गव यांची केंद्रीय माहिती आयोगात मुख्य माहिती आयुक्‍तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय चार माहिती आयुक्‍तांचीही नेमणूक करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आयोगात मुख्य माहिती आयुक्‍तांसह माहिती आयोगाची 11 पदे रिक्‍त आहेत. परंतु, फक्‍त तीनच माहिती आयुक्‍तांना आजपर्यंत काम पहावे लागत होते. सुधीर भार्गव हे माहिती विभागात सूचना आयुक्‍त आहेत आणि त्‍यांना आता बढती देत मुख्य आयुक्‍तपदी नेमणूक करण्यात आली आहे. राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी IFS अधिकारी यशवर्धन कुमार सिन्हा, माजी IRS अधिकारी वनजा एन सरना, माजी IAS नीरज कुमार गुप्ता आणि माजी विधी सचिव सुरेश चंद्र यांच्या केंद्रीय माहिती अयोगात माहिती आयुक्‍तपदी नियुक्‍तीला मंजुरी दिली आहे. मुख्य माहिती आयुक्त आर. के. माथुर आणि माहिती आयुक्त यशोवर्धन आझाद, श्रीधर आचार्युलू आणि अमिताव भट्टाचार्य यांच्या निवृत्तीनंतर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय माहिती आयोग

भारतात केंद्रीय माहिती आयोग (CIC) याची स्थापना सन 2005 मध्ये महितीचा अधिकार अधिनियम-2005 अंतर्गत केली गेली आहे. केंद्रीय माहिती आयोग शासनाच्या यंत्रणेत पारदर्शकता राखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभवते. या प्रकारची पारदर्शकता भ्रष्टाचार, शोषण आणि दुरुपयोग यांना आळा घालण्यासाठी आवश्यक आहे. केंद्रीय माहिती आयोगात एक मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त आणि 10 माहिती आयुक्त असतात. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधानाच्या अध्यक्षतेत समितीकडून शिफारसीनंतर भारताचे राष्ट्रपती करतात. एखाद्या प्रकरणाला योग्य आधार असल्यास आयोग तपासाचे आदेश देऊ शकतो. आयोगाकडे सार्वजनिक प्राधिकरणाद्वारा आपल्या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरक्षित करण्याचे अधिकार आहेत. जर सार्वजनिक प्राधिकरण या कायद्याच्या तरतुदींना पूर्ण करीत नसेल तर आयोग समानता आणण्यासाठी पावले उचलण्याची शिफारस करू शकतो.