कॅस्पियन सागरतटावरील पाच देशांत ऐतिहसिक करार

0
44

रशिया आणि इराणसह पाच देशांनी ऐतिहासिक कॅस्पियन सागर करारावर सह्या केल्या आहेत. कझाकस्तानमधील अकताऊ शहरात रविवारी या करारावर सह्या करण्यात आल्या. कॅस्पियन सागराच्या कायदेशीर स्थितीबाबत हा समझोता करार करण्यात आलेला आहे.

एशिया आणि युरोपमध्ये असलेल्या कॅस्पियन सागरातील नैसर्गिक साधनसंपत्तीबाबत या देशांत होत असलेला तणाव कमी होण्यास या कराराने मदत होणार आहे. सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यानंतर कॅस्पियन सागरातील साधनसंपत्तीबाबत अझरबैजान, इराण, कजाखस्तान, रशिया आणि तुर्कमेनिस्तान याच्यात विवाद निर्माण झाला होता.

या कराराबाबत सहमती होणे हे अतिशय कठीण काम होते, असे रविवारी सामूहिक सहमतीने झालेल्या या समझोता करारावर सह्या झाल्यानंतर कझाखस्तानचे राष्टृपती नूरसुल्तान नजरबावेय यांनी सांगितले, तर 20 वर्षांच्या सामूहिक प्रयत्नांनंतर हा युगप्रवर्तक करार शक्‍य झाला आहे, असे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे.
या कराराने कॅस्पियन देशांमध्ये लष्करी सहकार्य वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगून इराणची राष्ट्रपती हसन रूहानी यांनी खुशी व्यक्त केली.