‘कॅटलान’ला स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा ठरावास मंजूरी

0
20

गेल्या चार वर्षांपासून स्वतंत्र होण्यासाठी धडपड करणाऱ्या स्पेन पूर्वेतील कॅटलान प्रातांच्या पार्लमेंटने स्पेनपासून वेगळे होत स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा ठराव मंजूर केला. यावेळी मतदानापूर्वीच विरोधकांनी सभात्याग करीत मतदानावर बहिष्कार टाकला. तर कॅटलानच्या प्रांतीय पार्लमेंटने स्वत:ला स्वतंत्र्य घोषित केल्यानंतर स्पेनचे पंतप्रधान मारिआनो राहॉय यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

# स्पेनने कॅटलानला स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याला आधीपासूनच विरोध केला असून मॅडरिड सरकार कॅटलानची सुत्रे हातात घेण्याच्या  तयारीत आहे.

# हा ठराव कॅटलानला स्वतंत्र राष्ट्र करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करीत स्पेनसोबत कॅटलानला समान दर्जा देण्याबाबत चर्चा करण्यासाठी पारित करण्यात आला आहे.

# कॅटलान पार्लमेंटच्या ७० सदस्यांनी स्पेनपासून वेगळे होण्याच्या बाजूने मतदान केले. तर या विरोधात १० सभासदांनी मतदान केले. तर दोन सभासद अनुपस्थित होते. १३५ सदस्यांच्या कॅटलना पार्लिमेंटमध्ये विरोधकांनी या प्रस्तावावर विचार करण्यास नकार दिला.

# दरम्यान या स्वायत्त प्रदेशाला कलम १५५ नुसार स्पेनच्या केंद्र सरकारच्या नियंत्रणात आणण्याचा ठराव स्पेनकडून मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. 

# स्पेनपासून वेगळे होण्याच्या निर्णयाबाबत जनमताचा कौल घेण्यात आला होता. या वेळी लष्कर आणि जनतेच्या चकमकीत सुमारे ४०० लोक जखमी झाले. तर केवळ ४२ टक्के जनतेने मतदान केले. त्यातील ९० टक्के जनतेने स्पेनपासून वेगळे होण्याच्या बाजूने कौल दिला होता.