कुस्तीत भारताच्या सचिन राठीने पटकावले ‘सुवर्ण’

0
20

आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा मल्ल सचिन राठीने ७४ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. त्याने मंगोलियाचा मल्ल बॅट एर्डेनेला आस्मान दाखवले.

यापूर्वी शनिवारी विशाल कालीरमण, सचिन गिरी आणि नवीन हे आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पराभूत झाले होते. त्यांना रौप्य पदावरच समाधान मानावे लागले होते.

फ्री स्टाईल बाउटच्या सुरूवातीच्या दिवशी पाचपैकी चार मल्ल पदक जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत. करणने ६५ किलो वजनी गटात कांस्य पदक घेतले होते.