कुमारस्वामी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

0
23

र्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी शपथ घेतली. त्याचबरोबर जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.राज्यपाल वजुभाई वाला यांनी दोन्ही नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली

दीड दिवस मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारणारे माजी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर आता एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 

आजच्या या शपथविधी सोहळ्यात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, मायावती आदी यावेळी उपस्थित होते. कर्नाटक येथे अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर, दीड दिवसाचे सरकार पडल्यानंतर अखेर काँग्रेस आणि जेडीएसच्या युतीचे सरकार स्थापन झाले आहे.