‘कर्नाटक’ गुंतवणुकीमध्ये देशात प्रथम

0
21

कर्नाटक राज्याने गुंतवणुकीमध्ये देशात एक नवा उच्चांक निर्माण केला आहे. औद्योगिक गुंतवणुकीसाठी राज्याने जानेवारी ते सप्टेंबर 2017 पर्यंत एकूण 1,47,625 लाख कोटी रु. औद्योगिक गुंतवणुकीचे प्रस्ताव स्वीकारले आहेत. गुजरातमध्ये या कालावधीत 65,741 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याचे प्रस्ताव आलेे आहेत. राज्यात गुंतवणूक करण्यात येणारा आकडा हा गुजरातपेक्षा दुप्पट आहे.

# औद्योगिक धोरण व चालना खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार कर्नाटक राज्य गुंतवणुकीमध्ये देशात प्रथम स्थानावर आहे. 

# गुजरातमधील गुंतवणूक 65,741 कोटी इतकी असून राष्ट्रीय पातळीवर त्यांचा सहभाग 19.79 टक्के इतका आहे. तर महाराष्ट्रातील गुंतवणूक 25,018 कोटी रु. ची आहे. महाराष्ट्राचा सहभाग 7.53 टक्के इतका आहे. गुजरात व महाराष्ट्राने 321 व 255 गुंतवणुकीचे प्रस्ताव  स्वीकारले आहेत.

# तर कर्नाटकात 163 प्रस्ताव स्वीकारलेले आहेत. मागीलवर्षी कर्नाटकात गुंतवणुकीसाठी 1,54,153 कोटी रु. चे प्रस्ताव होते. त्यामध्ये 37.55 टक्के सहभाग होता. 2015 मध्ये कर्नाटकात 31,668 कोटी रु. ची गुंतवणुकीत होती. 

# यापूर्वी गुंतवणुकीमध्ये गुजरातचा वरचा क्रमांक होता. आंध्रप्रदेशमध्ये 24031 कोटींची गुंतवणूक झालेली असून 120 प्रस्ताव स्वीकारलेले आहेत. 

# गेल्या दोन दशकामध्ये राज्यात आर्थिक व प्रशासकीय सुधारणा करण्यात आल्या असून कर्नाटकाची वाटचाल जागतिक बाजारपेठेकडे वळली आहे. निर्यातीमध्येही कर्नाटकाचा सहभाग मोठा आहे. त्यामुळे देशाला परकीय चलन मिळते.

# कर्नाटकात मनुष्यबळाचा दर्जाही उंचावलेला आहे. त्यामुळे राज्यात गुंतवणूक करण्यास परकीय कंपन्या पुढे दोन आहेत