ओमप्रकाश रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती

0
14

सध्या निवडणूक आयुक्त असलेले ओम प्रकाश रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी माजी अर्थसचिव अशोक लवासा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

# केंद्र सरकारने विद्यमान निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावतयांच्या नावाची नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून घोषणा केली आहे. 

# मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांचा कार्यकाल २३ जानेवारीला संपुष्टात येत आहे. जोती यांनी नसीम जैदी यांच्या निवृत्तीनंतर गेल्या वर्षी जुलै महिन्यात पदभार स्वीकारला होता. 

# निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार निवडणूक आयोगाला एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो, तर इतर दोन निवडणूक आयुक्त असतात. राष्ट्रपतींद्वारे दोन निवडणूक आयुक्तांपैकी वरिष्ठ आयुक्ताची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली जाते. 

# रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्याबरोबरच अशोक लवासा यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी लवासा हे वित्त सचिव पदावर काम करत होते. ते देखील २३ जानेवारीला आयुक्त पदाची सूत्रे हाती घेत आहेत.

ओम प्रकाश रावत

# ओम प्रकाश रावत हे 1977 च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आहेत. देशाचे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची ऑगस्ट 2015 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. केंद्र आणि राज्य पातळीवर त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे.

# निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यांनी 1993 साली संरक्षण मंत्रालयाचे संचालक म्हणूनही काम पाहिलं आहे.