ओएनजीसीच्या अध्यक्षपदी शशी शंकर

0
15

भारतातील सर्वात मोठी ऑईल आणि गॅस उत्पादन करणारी सरकारी कंपनी असलेल्या ओएनजीसी (ONGC) या कंपनीच्या अध्यक्षपदी शशी शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देशातील सर्वात मोठी ऑईल आणि गॅस उत्पादन करणारी सरकारी कंपनी असलेल्या ओएनजीसी या कंपनीच्या अध्यक्षपदी शशी शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने त्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब केले. त्यांची ही नियुक्ती सुरूवातीला एक वर्षासाठी करावी अशी शिफारस पेट्रोलियम मंत्रालयाने केली होती.

साधारणपणे या कंपनीच्या अध्यक्षस्थानी होणारी निवड पाच वर्षांसाठी असते पण पेट्रोलियम मंत्रालयाने त्यांच्या नियुक्तीचा कालावधी सुरूवातीला केवळ एक वर्षाचाच असावा अशी शिफारस सरकारकडे केली होती. या कालावधीत त्यांच्या कार्याची दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाईल. अध्यक्षांच्या कार्याचा आढावा वार्षिक स्वरूपात घेतला जातो पण यावेळी ऑईल मंत्रालयाने हे नवीन नियम प्रस्तावित केले होते. तथापी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मात्र त्यांची ही निवड पुर्ण मुदतीसाठी केली आहे.