ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत पहिला आशिया संघ

0
269

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांदरम्यानच्यास 71 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियात भारताने प्रथमच कसोटी मालिका विजय मिळवला आहे.

6 जानेवारी 2019 रोजी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची सिडनी येथील चौथी कसोटी ड्रॉ झाली. त्यामुळे चार सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारत ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणारा जगातला पाचवा आणि आशियातला पहिला संघ आहे. यापूर्वी इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलँडने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकलेली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये 1947 साली पहिली कसोटी मालिका खेळली होती. तेव्हापासून आतापर्यंत भारताने ऑस्ट्रेलियात 12 कसोटी मालिका खेळल्या. त्यातील हा पहिलाच मालिका विजय आहे.

ऑस्ट्रेलियात इतर देशांनी जिंकलेल्या कसोटी मालिका 

इंग्लंडने ऑस्ट्रेलियात तब्बल १३ वेळा कसोटी मालिका जिंकल्या आहेत.

वेस्ट इंडिज ( १९७९-८०, १९८४-८५, १९८८-८९, १९९२-९३) 

न्यूझीलंड (१९८५ -८६) 

दक्षिण आफ्रिका (२००८-०९, २०१२-१३, २०१६-१७)

भारत ( २०१८-१९) 

भारत हा ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणारा भारतीय उपखंडातील पहिला देश आहे.