“ऑक्‍सिटोसीन’ संप्रेरकामुळे निर्माण होते संघभावना

0
33

“ऑक्‍सिटोसीन’ हे “प्रेमाचे संप्रेरक’ असल्याचे मानले जाते. यामुळे सामाजिक व लैंगिक सुसंवाद प्रस्थापित होण्यास मदत होते. प्रेमभावना, आई व बाळामधील जिव्हाळ्याचे संबंध यात “ऑक्‍सिटोसीन’ची महत्त्वाची भूमिका असते. आता या संप्रेरकामुळे अन्य लोकांशी सहकार्य करण्याची व संघभावना निर्माण होते, असा शोध स्वित्झर्लंडमधील शास्त्रज्ञांनी लावला आहे.

“ऑक्‍सिटोसीन’चे प्रमाण नैसर्गिक असेल तर इतरांना सहकार्य करायचे की नाही हे आपल्याला ठरविता येते. स्वीत्झर्लंडमधील नीऊटेल विद्यापीठातील संशोधक जेनिफर मॅकक्‍लंग झेग्नी तिर्की व त्यांच्य सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनातून हा नवा शोध लागला आहे. इतरांशी सहकार्य करण्याची अथवा न करण्याच्या निर्णयाचा संबंध “ऑक्‍सिटोसीन’शी असतो, हे लक्षात आल्यानंतर त्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला.

कधीकधी माणूस संघात सहभागी का व कशासाठी होतो तर कधी एकटे राहण्याचा निर्णय का घेतो, याचा अभ्यास तिर्की यांनी केला. यासाठी त्यांनी “ऑक्‍सिटोसीन’वर लक्ष केंद्रित केले होते. याबाबतचे निष्कर्ष “प्रोसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी बी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. या अभ्यासासाठी त्यांनी “अंडी शोध मोहीम’ राबविली, यासाठी स्पर्धकांचे दोन गट करून त्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला.