“एसईझेड’ धोरणविषयक अभ्यास गटाच्या अध्यक्षपदी बाबा कल्याणी

0
16

देशातील विशेष आर्थिक क्षेत्र धोरणाविषयी अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने काही तज्ञ व्यक्तींचा एक गट स्थापन केला आहे. भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी या अभ्यासगटाच्या अध्यक्षस्थानी आहेत. या गटात एकूण 10 मान्यवरांचा समावेश आहे.

1 एप्रिल 2000 रोजी देशात विशेष आर्थिक क्षेत्रविषयक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली. मे 2005 मध्ये संसदेने यासंदर्भातील अधिनियमाला मंजुरी दिली आणि 23 जून 2005 रोजी राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केले. या संदर्भात अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला गट, या धोरणाचे मूल्यांकन करणार असून, सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेत निर्यातदारांच्या गरजा पूर्ण करण्यासंदर्भात सूचना करणार आहे. या गटाने तीन महिन्यांच्या अवधीत आपल्या शिफारसी सादर करणे अपेक्षित आहे.