एमएसएलटीएच्या सचिवपदी सुंदर अय्यर यांची फेरनिवड

0
271

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) अध्यक्षपदी मुंबईचे भरत ओझा यांची, तर सचिवपदी पुण्याचे सुंदर अय्यर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच माजी अध्यक्ष शरद कन्नमवार यांची संघटनेच्या आजीव अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

निवडणुकीचा निकाल निवडणूक अधिकारी खुसरो श्रॉफ व निखिल संपत यांनी उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील ऍड. मोहन खटावकर यांच्या अध्यक्षतेखाली एमएसएलटीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुंबई येथे जाहीर केला.कार्यकारिणी सभासदपदासाठीच्या निवडणुकीत अभिषेक ताम्हाणे (पुणे), शीतल भोसले (कोल्हापूर), मिलिंद देशपांडे (परभणी), शिवम मोर (यवतमाळ), अली पंजवाणी (नांदेड), राजेश बेलानी (मुंबई), वर्षा स्वामी (मुंबई) व राजीव देसाई (सोलापूर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 2018-2022 या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली.