एपीएलच्या मुख्य प्रशिक्षकपदी व्यंकटेश प्रसादची नियुक्ती

0
222

अफगानिस्तान प्रीमियर लीग (एपीएल) फ्रेंचाइजी नंगरहार लियोपार्ड्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी भारताचे माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याची नियुक्ती करण्यात आली आहे. ५ ऑक्टोबरपासून एपीएलचा पहिला हंगाम सुरू होत आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याला नंगरहार लियोपाडर्स संघाने आयकॉन प्लेयर बनवले आहे.

याशिवाय मुजीब उर रहमान, बेन कटिंग, शफीकउल्लाह शफक, नजीबुल्लाह तराकी, मिशेल मेक्लेगन, मुशफिकुर रहीम, मोहम्मद हफीज, रहमत शाह, नवीन उल हक, जहीर खान, संदीप लामिछाने, फजल हक, इमरान जनत या खेळाडूंना लियोपार्ड्सने संघात घेतले आहे.

एपीएलमध्ये मुजीब जरदान (१७ वर्ष) हा सर्वात युवा खेळाडू असणार आहे. नंगरहार लियोपार्ड्स संघाचे तो प्रतिनिधीत्व करणार आहे. भारताकडून १६१ एकदिवसीय आणि ३३ कसोटी सामने खेळणारे प्रसाद आयपीएलमध्ये किंग्स इलेवन संघाचे प्रशिक्षक आहे. ते याआधी रॉयल चैलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स संघालादेखील मार्गदर्शन करत होते.