एनसीइआरटीच्या पुस्तकांमध्ये १३३०पेक्षा अधिक बदल

0
29

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी)च्या १८२ पाठ्यपुस्तकांमध्ये यंदा १३३४ पेक्षा अधिक बदल करण्यात आले आहेत.राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी)च्या १८२ पाठ्यपुस्तकांमध्ये यंदा १३३४ पेक्षा अधिक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रीय प्रतिकांवर भर देण्यात आला असून यामध्ये आता बाजीराव पेशवा आणि महाराणा प्रताप यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. मात्र, भगतसिंह यांच्या धड्यामधील कॉम्रेड हे शब्द हटवण्यात आले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

एनसीइआरटीने ५७३ सायन्सची पुस्तके, ३१६ सामाजिक शास्त्राची आणि १६३ संस्कृत पुस्तकांची निर्मिती केली आहे. इयत्ता ६वी ते १०वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये काही नव्या बाबींसह, दुरुस्त्या आणि माहितीत नवी भर टाकण्यात आले आहे.

या बदलांसह आणलेल्या या नव्या पुस्तकांमध्ये नव्या गोष्टींवर भर देण्यात आला असून यामध्ये राष्ट्रीय नेते असलेले मराठा सम्राज्याचा पेशवा बाजीराव बल्लाळ, जाट राजे सुरजमल, राजपुतांचे आदर्श महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यसैनिक लाला लजपतराय आणि वल्लभभाई पटेल तसेच आध्यात्मिक गुरु श्री अरुबिंदो आणि स्वामी विवेकानंद यांचा समावेश इतिहासाच्या पुस्तकात करण्यात आला असून त्यांच्यासाठी अधिक जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पाठ्यपुस्तकांमधील बदलांपैकी स्वामी विवेकानंद आणि ऑरोबिंदो घोष यांच्यावरील माहिती ही सर्वांत जास्त लक्षवेधी ठरलेली बाब आहे. कारण, जुन्या ८वीच्या पुस्तकात रामकृष्ण मिशन आणि स्वामी विवेकानंदांबाबत केवळ २१ शब्दांची माहिती होती. तर नव्या पुस्तकात त्यांच्यावर २५० शब्दांची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर या पुस्तकातील भगतसिंहांवरील ११ व्या धड्यात चंद्रशेखर आझाद, सुखदेव आणि राजगुरु यांच्या नावाचा नव्याने उल्लेख करण्यात आला आहे.

क्रांतिकारी देशभक्तांपैकी असलेले भगतसिंह आणि त्यांचे कॉम्रेड सम्राज्यवादाविरोधात लढा देत होते. तसेच कामगार, शेतकरी आणि छळवणूक होत असलेल्या वर्गासाठी क्रांती करण्याची त्यांची इच्छा होती, असा परिच्छेद भगतसिंह यांच्या धड्यामध्ये होता. त्यात बदल करुन नव्या पुस्तकात ‘आणि त्यांचे कॉम्रेड’ हा शब्द वगळून त्याजागी चंद्रशेखर आझाद आणि सुखदेव या शब्दांचा वापर केला आहे. त्याचबरोबर इयत्ता ७वीच्या पुस्तकातील १०व्या धड्यात जाट राजे सुरजमल यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.