एनएसजीच्या महासंचालकपदी सुदीप लखटाकिया

0
17

राष्ट्रीय सुरक्षा पथक (एनएसजी) म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो २६ नोव्हेंबर २००८ मधील मुंबई हल्ल्यातील अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमधील त्यांचा सहभाग. राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात एनएसजी ही जगात सहाव्या क्रमांकाची नावाजलेली संस्था आहे.

# राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) महासंचालकपदी नुकतीच आयपीएस अधिकारी सुदीप लखटाकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

# लखटाकिया हे तेलंगण केडरचे १९८४च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असून सध्या ते केंद्रीय राखीव पोलीस दलाचे विशेष महासंचालक आहेत.

# सध्या एनएसजीचे महासंचालक असलेले एस पी सिंह हे ३१ जानेवारी रोजी निवृत्त होत असून त्यांच्याकडून ते सूत्रे घेतील.

# पुढील वर्षी जुलैपर्यंत लखटाकिया हे एनएसजीचे महासंचालक राहतील त्यानंतर ते निवृत्त होत आहेत.

# प्रत्यक्ष दहशतवाद व नक्षलवाद मोहिमांविरोधातील मोर्चेबांधणीत लखटाकिया हे निपुणआहेत.

# केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक या पदावर नियुक्त होण्यापूर्वी ते आठ वर्षे एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप) या सुरक्षा संस्थेत महानिरीक्षक होते.

राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी)

राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात एनएसजी ही जगात सहाव्या क्रमांकाची नावाजलेली संस्थाआहे. दहशतवादी हल्ले, विमान अपहरण किंवा तत्सम प्रसंगात या जवानांची कसोटीलागत असते. त्यांचे नव्वद दिवसांचे प्रशिक्षणही अतिशय खडतर असते. जर्मनीच्या जीएसजी ९ व ब्रिटनच्या एसएएस सुरक्षा संस्थेच्या धर्तीवर या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. एनएसजीच्या काही ब्लॅक कॅट कमांडोजना प्रशिक्षणासाठी इस्रायलमध्येहीपाठवण्यात येते. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो करीत असतात. देशात एनएसजीची एकूण पाच केंद्रे असून, त्याचे मुख्यालय गुरुग्राममधील मनेसर येथे आहे.