एकदिवसीय सामन्यात 10,000 धावा करणारा विराट कोहली सर्वात वेगवान फलंदाज

0
262

24 ऑक्टोबर 2018 रोजी विराट कोहली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 10,000 धावा काढणारा सर्वात वेगवान फलंदाज बनला आणि फक्त 205 डावांमध्ये त्याने हे विक्रम बनविले. यासोबत त्याने 259 डावांत हे विक्रम स्थापित करणाऱ्या सचिन तेंडुलकरला मागे टाकले.

भारताच्या विशाखापट्टणममधील वेस्टइंडीजविरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहली 81 धावांवर नाबाद असताना हे विक्रम नोंधाविले. स्पिनर ऍशले नर्सच्या गोलंदाजीवर त्याने त्याचा 10000 वा रन घेतला.
सध्या भारत 1-0 ने या मालिकेत पुढे आहे. गुवाहाटी येथे त्यांनी प्रथम सामना आठ बळीने जिंकला होता.

ठळक वैशिष्ट्ये
• एकदिवसीय सामन्यात 10000 धावा करणारा विराट कोहली पाचवा भारतीय फलंदाज आणि एकूण 13 वा फलंदाज बनला.
• बाकीच्या 4 भारतीय फलंदाजांमध्ये तेंडुलकर (18426), सौरव गांगुली (11221), राहुल द्रविड (10768) आणि एमएस धोनी (10123) यांचा समावेश आहे.
• एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,000 धावांचे विक्रम नोंदविणारा पहिला फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर ठरला होता. 2001 मध्ये ते इंदोर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतांना त्याने हे विक्रम केले.
• यादीत तेंडुलकर 18,426 धावासोबर पहिल्या क्रमावर तर कुमार संगकारा 14,234 धावांनी दुसऱ्या स्थानी आहेत.
• कोहली व्यतिरिक्त, यादीत अन्य एकमात्र सक्रिय खेळाडू म्हणून महेंद्रसिंग धोनीचा समावेश आहे. त्याने 2018 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या या विक्रमाची नोंद केली.