एअर इंडियाची ए३२० सेवामुक्त

0
23

निर्गुंतवणुकीचे वेध लागलेल्या एअर इंडियाने ए ३२० या श्रेणीतील उर्वरित तीन विमाने सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विमाने तब्बल तीन दशकांपासून एअर इंडियाच्या सेवेत असून या वर्षअखेरीस त्यांचे उड्डाण थांबेल.

सिंगल आयझलची १४ जुनी विमाने सेवेतून कमी करण्याची घोषणा एअर इंडियाने एप्रिल २०१४मध्येच केली होती. यातील ११ विमाने यापूर्वीच सेवामुक्त झाली आहेत. ही तीन विमाने अद्याप चांगली सेवा देत आहेत. मात्र त्यांचा कार्यकाळ पाहता त्यांना मर्यादित उड्डाणसेवा देण्यात येत आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने दिली.