एअर इंडियाचा ‘महाराजा’ सरकारीच

0
14

सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने रहित केला आहे. त्यामुळे एअर इंडियाचा महाराजा हा खासगी न होता भविष्यातही सरकारीच असेल हे स्पष्ट झाले आहे.

या कंपनीतून निर्गुंतवणूक करण्याच्या प्रयत्नांना यश न आल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. तोट्यात व कर्जाच्या बोजाखाली दबलेली ही कंपनी नफ्यात आणण्याचे उद्दिष्ट सरकारने आखले आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिगटाच्या एका बैठकीत सोमवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस पीयूष गोयल, नितीन गडकरी, सुरेश प्रभू आदी ज्येष्ठ मंत्री तसेच, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तोट्यातील एअर इंडियाला आर्थिक उभारी देण्यासाठी सरकार भरीव अर्थसाह्य करणार आहे. या कंपनीचा दैनंदिन डोलारा सावरण्यासाठी ही मदत केली जाईल.