‘उजाला’ योजनेचा मलेशिया येथे शुभारंभ

0
20

ऊर्जा मंत्रालयाद्वारा ऊर्जा दक्षता सेवा लिमिटेड (ई ई एस एल ), भारत सरकार च्या माध्यमातून उजाला (उन्नत ज्योती बाय अफोरडेबल लाईटिनींग फॉर ऑल) योजनेचा मलेशिया मधील मेलाका येथे प्रारंभ केला.

 

 हि योजना मेलाका चे मुख्यमंत्री दाटून सेरी उटामा यांच्या हस्ते झाले. ह्या योजनेमुळे मेलाका मध्ये प्रत्येक घरात १० उच्च गुणवत्ता असलेले ९ वॅट एलईडी बल्ब दिले जाणार आहेत.

भारतात या योजनेअंतर्गत तीन वर्षात एलईडीच्या किंमतीत ८५ टक्के घट झाली असून वीज ग्राहकांची वीज बिलेही १५ टक्कयांनी कमी झाली आहेत. भारत एलईडीचा जगातील सर्वात मोठा बाजार आहे व ईईएसएल वीज संरक्षणाच्या क्षेत्रात असलेली अव्वल कंपनी बनली आहे.