इस्रो प्रमुख के शिवन यांचा डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान

0
43

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) चे अध्यक्ष कैलासवाडीवू शिवन यांना तामिळनाडू राज्य सरकारने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार दिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीतील त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

के शिवन बद्दल माहिती :

• शिक्षण : ते मूळतः तामिळनाडूच्या कन्नियकुमारी जिल्ह्यातील आहेत. 62 वर्षीय अवकाश शास्त्रज्ञाने 1980 मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अभियांत्रिकी विषयात बॅचलर पदवी मिळविली.
• बंगळुरुमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) मधून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ते इस्रोमध्ये दाखल झाले.
• त्यांना ‘रॉकेट मॅन’ म्हणून ओळखले जाते.
• त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर आणि लिक्विड प्रोपल्शन सेंटरचे संचालक म्हणून काम पाहिले आहे.
• ते 6डी ट्रॅजेक्टोरी सिम्युलेशन सॉफ्टवेयर ‘सीतारा’ चे मुख्य अभियंता् होते.
• त्यांनी इस्रोच्या प्रक्षेपण वाहनांच्या डिझाईन आणि विकासावर कार्य केले आहे आणि मिशन योजना, डिझाइन आणि मिशन एकत्रीकरण आणि विश्लेषणाच्या समाप्तीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे.
• त्यांच्या नेतृत्वात स्वदेशी क्रायोजेनिक स्टेजसह सर्वात यशस्वी जीएसएलव्ही फ्लाइटची ऐतिहासिक कामगिरी केली गेली.
• इस्रोने चंद्रावरील भारताचे आपले मिशन चंद्रयान-2 त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या सुरू केले.
• के शिवन यांना डॉ विक्रम साराभाई रिसर्च अवॉर्ड (1999) यासह अन्य अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार :

• 2015 मध्ये माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जे जयललिता यांनी त्यांच्या नावावर पुरस्कार जाहीर केला होता.
• डॉ. कलाम यांचा वाढदिवस (15 ऑक्टोबर) हा युवा पुनर्जागरण दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले होते.
• डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्कार जे वैज्ञानिक वाढ, मानवता आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करतात त्यांना प्रदान केले जाते. पुरस्कारप्राप्त व्यक्ती तामिळनाडूची रहिवासी असणे आवश्यक आहे.
• बक्षीस : यात 8 ग्रॅम सोन्याचे पदक, 5 लाख रुपये रोख आणि सन्मानपत्र आहे. हे दरवर्षी स्वातंत्र्यदिनी दिले जाते.
• पहिला प्राप्तकर्ता : 2015 मध्ये जयललितांनी इस्रो वैज्ञानिक एन. वलारमथी यांना प्रथम कलाम पुरस्कार प्रदान केला होता.