इस्त्रोच्या अध्यक्षपदी के. शिवन

0
73

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) अध्यक्षपदी क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ के. शिवन यांची निवड झाली आहे. ‘रॉकेट मॅन’ या नावानेही के. शिवन यांना ओळखले जाते.

# सध्या थिरुवअनंतपूरम येथील विक्रम साराभाई संशोधन केंद्राचे शिवन हे संचालक आहेत. त्यांच्यावर व्हेकल लाँचचा आराखडा आणि त्याला विकसित करण्याची जबाबदारी होती.

# के. शिवन इस्त्रोचे मावळते अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांच्याकडून कार्यभार स्वीकारतील. शिवन यांच्या निवडीवर आज निवड समिती मंडळाने शिक्कामोर्तब केले.

# आगामी काळात उपग्रह आणि रॉकेट लाँच करण्यासाठी इस्त्रो धोरणात्मक योजना तयार करत आहे. अशात शिवन यांची निवड योग्य मानली जात आहे.

# आयआयटी बॉम्बेचे शिवन माजी विद्यार्थी असून शिवन याचे पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, आणि जीएसएलव्ही एके-३ चा उपग्रहवाहू व्हेईकलचा आराखडा तयार करण्यात योगदान अतिशय महत्त्वाचे आहे.

# पीएसएलव्ही या रॉकेटवाहू व्हेईकलवरून आतापर्यंत १०४ उपग्रह अवकाशात सोडले गेले आहेत. याचे श्रेय शिवन यांना जाते.

इस्त्रो (ISRO)

इस्त्रो ची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये भारताचे सुप्रसिध्द शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांनी केली. Indian Space Research Organization याचे लघु रूप म्हणजेच ISRO होय. याला मराठी मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था असे म्हणता येईल. इसरो अगोदर भारताच्या अणू संशोधन विभागाच्या अखत्यारीत येत असे. पण त्याला 1969 मध्ये स्वतंत्र विभाग बनवले गेले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक, अशी मूलभूत संस्था आहे.

क्रायोजनीक इंजीन

लांब टप्प्या च्या मिसाईल लॉन्च साठी आवश्यक असलेली टेक्नॉलॉजी म्हणजे क्रायोजनीक इंजीन होय. ही एक खूप चांगली पण तेवढीच जटील तंत्रज्ञान असते. हे तंत्रज्ञान फक्त 5 देशांकडेच उपलब्ध होत. ज्यात रशिया, अमेरिका, चायना, फ्रांस आणि जपान हे देश येतात. हे तंत्रज्ञान असलेले देश हे एलिट स्पेस क्लब (elite space club) चे मेंबर म्हणून ओळखले जातात. सध्या यात भारत देखील शामिल आहे.