इस्त्रोची ऐतिहासिक कामगिरी; 28 देशांच्या लघुउपग्रहांसह उड्डाण

0
169

विद्युत चुंबकीय मोजमोपाच्या उद्देशाने तयार केलेल्या भारताच्या ‘एमिसॅट’ या उपग्रहाचे आज (सोमवार) सकाळी 9.27 मिनिटांनी यशस्वी उड्डाण झाले. या उपग्रहात 28 देशांचे लघुउपग्रह आहे.

एमिसॅट या उपग्रहाबरोबरच विविध देशांचे 28 लघुउपग्रहही ‘इस्रो’तर्फे अवकाशात सोडण्यात आले. ‘पीएसएलव्ही-सी 45’ या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण झाले असून, ‘पीएसएलव्ही’चे 47वे उड्डाण होते. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.

एमिसॅट हा उपग्रह 749 किमी वजनाचा असून, डीआरडीओसाठी हा उपग्रह मदत करणार आहे. या उपग्रहासह अमेरिकेच्या 24, लिथुआनियाच्या दोन, स्पेन आणि स्वित्झर्लंडच्या एक अशा 28 लघुउपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.