इंग्लंडने पहिल्यांदा जिंकला क्रिकेट विश्वचषक : विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच सुपर ओवर खेळण्यात आली

0
40

इतिहासात प्रथमच इंग्लंड क्रिकेट संघ विश्वचषक विजेता बनला आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून इंग्लंडने आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 ट्रॉफी जिंकली आहे.

• क्रिकेट विश्वचषकच्या 44 वर्षांच्या इतिहासात इंग्लंडने प्रथमच विश्वचषक जिंकला आहे. इंग्लंडने यापूर्वी कधीच ही स्पर्धा जिंकली नाही.
• आपल्याच देशात ही स्पर्धा जिंकणे हे एक विक्रम आहे. या आधी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोनच देशांनी हे विक्रम केले आहे.

एका दृष्टीक्षेपात अंतिम सामना :

• विश्वचषक 2019 चा अंतिम सामना इंग्लंडच्या लॉर्ड्स येथे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. न्यूझीलंड संघाने सामन्याच्या आधी टॉस जिंकून निर्धारित 50 षटकात 8 बाद 241 धावा केल्या. इंग्लंडने सुद्धा 50 षटकात 9 बाद 241 धावा केल्या. यानंतर, सुपरओव्हर खेळण्याचा निर्णय घेण्यात आला.
• सुपरओव्हर – इंग्लंडसाठी बेन स्टोक्स आणि जोस बटलरने ट्रेंट बोल्टच्या फलंदाजीत 15 धावा केल्या. न्यूझीलंडच्या जेम्स नीशम आणि मार्टिन गपटिलने जोफ्रा आर्चरचा सामना केला. त्यांनीही 6 चेंडूत 15 धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये सुद्धा सामना टाय झाला. परंतु, इंग्लंडने मारलेल्या बाउंड्रीच्या आधारावर त्या संघाला विजेता घोषित करण्यात आले.
• यासोबतच पहिल्यांदाच जागतिक विजेता बनण्याचे न्यूझीलंडचे स्वप्न पुन्हा एकदा संपले.

विश्वचषक स्पर्धेत प्रथमच सुपर ओव्हर :

• क्रिकेटच्या इतिहासात हा पहिला एकदिवसीय सामना होता, ज्यात सुपर ओव्हर खेळण्यात आली आणि ती सुद्धा टाय झाली. याआधी, कोणत्याही आयसीसी टूर्नामेंटमध्ये सुपर ओव्हरने अंतिम निर्णय घेतला नव्हता.
• सुपर ओवरचे नियम – अधिक धावा करणारा संघ जिंकतो. परंतु जर सुपर ओवरमध्ये दोन्ही संघांनी सारखेच धावा केल्या तर ज्या संघाने आपल्या डावात अधिक वेळा बाउंड्री नोंदविली असेल तो विजेता ठरतो. सुपर ओवर एकत्र करून जो संघ अधिक बाउंड्री लावतो तो संघ विजेता असतो.

अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सलग दुसरा पराभव :

• विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हा सलग दुसरा पराभव आहे. 2015 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला हरवले होते.
• याशिवाय, इंग्लंडचा संघ काल चौथ्यांदा अंतिम फेरीत खेळला होता. अंतिम फेरीत इंग्लंडला याआधी तीन वेळा पराभव करावा लागला होता.
• 1979 च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला वेस्टईंडीझने, 1987 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि 1992 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने पराभूत केले होते.

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक खिताब जिंकणारा संघ :

• ऑस्ट्रेलिया विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक खिताब जिंकणारा संघ आहे. ऑस्ट्रेलियाने पाच वेळा क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये असे ऑस्ट्रेलियाने पाच खिताब जिंकले आहेत.
• त्यानंतर, या यादीत दुसऱ्या स्थानावर भारतीय संघ आणि वेस्ट इंडिजचे नाव आहे ज्यांनी प्रत्येकी दोन खिताब जिंकले आहेत. वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 चा खिताब जिंकला. भारतीय संघ 1983 आणि 2011 विश्वचषक विजेता आहे.
• पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. 1992 मध्ये पाकिस्तान आणि 1996 साली श्रीलंका जिंकला होता.
• तर, इंग्लंड संघाने काल पहिल्यांदा हा खिताब जिंकला आहे.
• यासोबतच, आपल्याच देशात ही स्पर्धा जिंकणारा इंग्लंड तिसरा देश ठरला आहे. हा विक्रम करणारा पहिला देश भारत आहे. 2011 मध्ये भारताने आपल्या मातीवर ही स्पर्धा जिंकली होती. मुंबईच्या वानखेडे येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता. 2015 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव करून विश्वचषक जिंकला.