आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने जिंकले सुवर्ण पदक

0
13

भारताची आयकॉन असलेली बॉक्सर मेरी कोमने आशियाई बाक्सिंग चॅम्पियनशिपवर पाचव्यांदा आपले नाव कोरले. मेरी कॉमने ४८ किलो वजनीगटात कोरियाच्या किम हयांग मि चा ५-० असा सहज पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

# जागतिक स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मेरी कोमने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. अंतिम सामन्यात मेरी कोमने उत्तर कोरियाच्या किम ह्योंगला पराभूत केले. आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत ४८ किलो वजनी गटातील तिचे पहिले सुवर्ण आहे.

# यापूर्वी मेरी कोम ५१ किलो वजनी गटातून पाचवेळा या स्पर्धेत उतरली होती. यावेळी ती पहिल्यांदाच ४८ किलो गटात या स्पर्धेत सहभागी झाली होती. उपांत्य फेरीत जपानच्या सुबोसाविरुद्ध आक्रमक खेळ दाखवत तिने अंतिम फेरी गाठली होती.

# यापूर्वी आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या सीमा पुनिया, एल. सरिता देवी (६४ किलो), प्रियांका चौधरी (६० किलो), लोवलीना बोर्गोहेम (६९ किलो) आणि शिक्षा (५४ किलो) यांचा उपांत्य फेरीत पराभव झाला. त्यामुळे या महिला खेळाडूंना कास्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

मेरी कोमचे वैशिष्ट्य : 
मेरी कोमच्या वैशिष्ट्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मेरी कोम बॉक्सिंगमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. त्याचप्रमाणे मेरी कोम पाच वेळेची जागतिक विजेती आहे. आता पाच वेळेची आशियाई चॅम्पियनदेखील बनली. ती राज्यसभा खासदार आहे, ती पदक जिंकणारी पहिली खासदार ठरली आहे. ती सर्वात वरिष्ठ ३५ वर्षीय खेळाडू असून ती ३ मुलांची आई आहे. ती पती ओनलेर कोमच्या साथीने इंफाळमध्ये बॉक्सिंग अकादमी चालवते. ती सरकारी पर्यवेक्षक असल्याने बैठकांत सहभागी होते. मेरी कोमला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने २०१० मध्ये ‘मॅग्निफिसंट मेरी’ हे नाव देऊन गौरवले.