आशियाई कबड्डी स्पर्धेसाठी ‘अभिलाषा म्हात्रे’ कर्णधार

0
21

आशियाई कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाचे नेतृत्व मुंबईच्या अभिलाषा म्हात्रेकडे सोपविण्यात आले असून, हिमाचल प्रदेशाचा अजय ठाकूर पुरुष संघाचा कर्णधार असेल. ही स्पर्धा २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान इराण येथे पार पडणार आहे.

संघ – पुरुष – अजय ठाकूर (कर्णधार), दीपक हुडा, महेंद्रसिंह ढाका, मनिंदरसिंग,  मोहित चिल्लर, नितीन तोमर, प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, रोहित कुमार, सचिन शिंगाडे, संदीप नरवाल, सुरेंदर नाडा, सुरजीत, विशाल भारद्वाज

महिला – अभिलाषा म्हात्रे (कर्णधार), कंचन ज्योति दीक्षित, कविता, मनप्रीत कौर, मारिया मोनिका, पायल चौधरी, प्रियंका, प्रियंका नेगी, रणदीप कौर खेडा, रितु, साक्षी कुमारी, सायली जाधव, शमा परवीन, सोनिया.

अभिलाषा म्हात्रे

अभिलाषा एक कबड्डीपटू म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. प्रो कबड्डी लीगमध्ये आईस दिवाज संघाची कर्णधार म्हणूनही ती लोकप्रिय झाली आहे. कबड्डीच्या वर्ल्डकपमध्ये अभिलाषा खेळलेली आहे. भारताने त्यात सुवर्णही जिंकले होते. नवी मुंबई महापालिकेत क्रीडाधिकारी म्हणून ती कार्यरत आहे. सध्या चढाईत सर्वाधिक गुण तिच्या नावावर आहेत. सुहास कदम हे तिचे प्रशिक्षक आहेत.