‘आयुष्मान भारत’ला मंजुरी

0
24

देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सुरक्षा देणाऱ्या महत्त्वाकांक्षी अशा राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजनेला अर्थात ‘आयुषमान भारत’ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला प्रतिवर्षी पाच लाख रुपयांचे आरोग्यविमा कवच देणाऱ्या ‘आयुष्मान भारत’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

ही योजना राबवण्यासाठी ८५२.१७ अब्ज रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षासाठी पाच लाख रुपयांचे कवच देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ दारिद्रय़ रेषेखालील दहा कोटी कुटुंबांना होणार आहे. आता राष्ट्रीय स्वास्थ्य विमायोजना आणि ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना या योजना आता ‘आयुष्मान भारत’मध्येच समाविष्ट होणार आहेत. या योजनेनुसार रुग्णालयात दाखल करण्याआधीचा आणि नंतरचा खर्च दिला जाणार आहे.

ग्रामीण भागांत जे कुटुंब एकाच खोलीत राहाते आणि त्या खोलीच्या भिंती आणि छप्पर कच्चे आहे, ज्या कुटुंबात १६ ते ५९ या वयोगटातील कुणीही नाही, ज्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून अपंगावरच जबाबदारी आहे असे कुटुंब, कुटुंब प्रमुखाची जबाबदारी स्त्री पार पाडत असेल असे कुटुंब, अनुसूचित जाती व जमातीचे कुटुंब आणि मजुरीवर पोट भरणारे कुटुंब; यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

‘आयुष्मान भारत योजना’

या योजनेचा उद्देश या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या कमजोर लोकांना (बीपीएलधारक) आरोग्य विमा पुरविणे आहे. त्या अंतर्गत येणा-या प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम नसलेले आरोग्य विमा प्रदान करण्यात येईल. 10 दशलक्ष बीपीएलधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या व्यतिरिक्त, या योजनेखाली उर्वरित लोकसंख्या असलेले लोकांसाठी सुद्धा या योजनेचा लाभ करून देण्याचा विचार आहे.