आयसीसी विश्वचषक 2019 – इंग्लंडविरुध्द होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ वैकल्पिक ऑरेंज जर्सी घालणार

0
28

नेहमी निळ्या रंगाची जर्सी घालणारा भारतीय संघ 30 जून, 2019 रोजी इंग्लंडविरुद्धच्या क्रिकेट विश्वचषक सामन्यामध्ये नारंगी जर्सी घालण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत आपल्या ‘अवे’ सामन्यांत भारतीय संघ ‘नारंगी’ रंगीत जर्सी बरोबर खेळणार आहे. या जर्सीत निळ्या रंगाच्या ऐवजी नारंगी रंगाचे प्रभुत्व असेल.

• प्रस्तावित ‘नारंगी’ जर्सीची छायाचित्रे IANSने दिली आहे. बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी केली नाही.
• पर्यायी जर्सी असण्याची गरज असलेल्या इतर देशांपैकी भारत वगळून इतर सर्व देश म्हणजे अफगाणिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका यांनी स्पर्धेआधीच आपल्या जर्सीची घोषणा केली होती.
• हा निर्णय आयसीसीच्या नव्या नियमानुसार घेण्यात आला आहे, ज्यानुसार सर्व सहभागी संघांना टेलीव्हिजन आयसीसी स्पर्धांसाठी दोन वेगवेगळ्या रंगीत किट पुरविल्या जातील. यात मेजबान देशला रंग निवडीमध्ये प्राधान्य असेल. यजमान देशला संपूर्ण स्पर्धेत फक्त एकच रंगीत किट घालण्याची परवानगी असेल.
• सर्व संघांना प्रत्येक सामन्याच्या आधी सूचित केले जाईल की पुढे त्यांना कोणत्या रंगाची किट घालायची आहे. आयसीसीची ही घोषणा ही स्पर्धा सुरु व्हायच्या काही दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. 30 मे, 2019 पासून इंग्लंड व वेल्समध्ये विश्वचषक स्पर्धा सुरू झाली आहे.

होम जर्सी आणि अवे जर्सी :

• फुटबॉल खेळात ही संकल्पना आधीच वापरण्यात येत आहे. सगळे फुटबॉल संघ त्यांच्या वेगवेगळ्या सामन्यात वेगळ्या रंगाची जर्सी घालतांना दिसून येतात.
• प्रत्येक सामन्यासाठी, आयसीसीने एक संघाला होम टीमचा दर्जा दिला आहे तर दुसर्या संघासाठी सामना ही अवे संघ म्हणून दर्जा दिला जाईल.
• म्हणून, जेव्हा होम टीमला जर्सीची निवड करण्यास सूट असेल, तेव्हा दुसऱ्या संघाला अवे जर्सी घालावी लागेल.

भारतीय संघाच्या जर्सी रंग मध्ये बदल :

• आगामी आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये इंग्लंड, भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या चार संघांनी निळ्या रंगला प्राधान्य दिले आहे.
• स्पर्धेचा पूर्ण यजमान असलेल्या इंग्लंडला त्याच्या सर्व खेळांमध्ये जर्सीची निवड करण्याची सूट दिली जाईल, तर इतर तीन राष्ट्रांना त्यांच्या विरुद्ध खेळताना जर्सी रंग बदलणे आवश्यक आहे.
• इंग्लंड आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताने वेगळ्या जर्सी घालाव्या लागतील, कारण दोन्ही संघ भारताविरुद्धच्या सामन्यासाठी घरगुती संघ असतील.
• श्रीलंकेविरूद्ध भारताला होम टीमचा दर्जा देण्यात आला आहे आणि म्हणून त्या सामन्यांत भारत आपला पारंपारिक निळ्या जर्सीची निवड करेल.

भारतीय संघाची नवीन जर्सी :

• भारताच्या नवीन जर्सीचे अनावरण अद्याप होणार नाही, तरी अहवालानुसार, भारतीय संघच्या खेळाडूनी नारंगीला त्यांच्या नवीन जर्सीमध्ये प्रभावी रंग असल्याचे निवडले आहे.
• नवीन जर्सीमध्ये पुढे गडद निळा रंग आणि मागच्या बाजूस तसेच हातांवर नारंगी रंग असण्याची शक्यता आहे.
• 22 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात टीम इंडिया न्यू जर्सी सोबत खेळणार आहे आणि 30 जूनला इंग्लंड समोर.
• याशिवाय, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ उर्वरित सामन्यांमध्ये पारंपरिक निळा जर्सी सोबतच खेळण्याची अपेक्षा आहे.

इतर देशांच्या जर्सी रंगमध्ये बदल :

संघ – मूळ जर्सी रंग – नवीन ‘अवे’ जर्सी रंग
• अफगाणिस्तान – निळा – निळा + लाल
• बांगलादेश – हिरवा – लाल
• श्रीलंका – निळा – निळा + पिवळा
• दक्षिण आफ्रिका – हिरवा – पिवळा
• भारत – निळा – अद्याप अंतिम घोषणा नाही

आयसीसी विश्व चषक 2019 मध्ये भारत :

• दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडच्या साउथम्पटनमधील रोझ बाऊल स्टेडियमवर 5 जून, 2019 रोजी आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये भारतने आपली मोहीम शानदार विजयाने सुरू केली.
• 9 जून, 2019 रोजी भारतने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात 6 गडीने विजय नोंदविला.
• 13 जून, 2019 रोजी न्युझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला.
• 16 जून, 2019 रोजी भारताने पाकिस्तान विरुद्धच्या बहुचर्चित सामन्यात सुद्धा विजय मिळविला.