आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 – भारत करणार मेजबानी

0
57

भारत आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चा यजमान देश असेल. हीच पहिलीच वेळ आहे जेव्हा भारत एकटाच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करीत आहे. मागील तीनही वेळा भारताने आपल्या शेजारच्या राष्ट्रांसह विश्वचषक स्पर्धा आयोजित केली होती.

• या पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या 13 व्या आवृत्तीचे आयोजन भारत करणार आहे. लंडनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
• 1987 साली भारताने पाकिस्तान सोबत, 1996 मध्ये पाकिस्तान व श्रीलंका यांच्यासह आणि 2011 मध्ये श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यासह विश्वचषक स्पर्धा आयोजित केली होती.
• आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा 9 फेब्रुवारी – 26 मार्च, 2023 दरम्यान भारतात होणार आहे.
• विश्वचषक 2023 मध्ये 10 संघ सहभागी होतील. सर्वोच्च 7 राष्ट्रीय संघ आणि यजमान भारत हे विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र असतील. उर्वरित दोन संघ विश्वचषक स्पर्धाच्या पात्रता राउंड मध्ये पात्रता मिळवतील.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा :

• क्रिकेट विश्वचषक स्पर्धाचे सर्वात जास्त वेळा आयोजन इंग्लंडने केले आहे. इंग्लंडने पाच वेळा स्पर्धा आयोजित केली आहे, 1975, 1979 आणि 1983 मध्ये एकट्याने आणि आयर्लंड, नेदरलँड, स्कॉटलँड आणि वेल्ससह 1999 आणि 2019 मध्ये.
• 1987 विश्वचषक स्पर्धा ही पहिली आवृत्ती होती जी इंग्लंडने आयोजित नव्हती केली. ती स्पर्धा भारत आणि पाकिस्तान संयुक्तपणे आयोजित केली होती.
• विश्वचषक 2011 च्या स्पर्धेसाठी पाकिस्तान सुद्धा यजमान होता, परंतु 2009 मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघाच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर झालेल्या अनिश्चित सुरक्षा परिस्थितीमुळे पाकिस्तानला यातून रद्द करण्यात आले.
• 2011 विश्वचषक स्पर्धाचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता, ज्यात भारताने प्रथम विश्वकरंडक जिंकल्यानंतर 28 वर्षानंतर विश्वचषक स्पर्धा जिंकली आणि ती स्पर्धा जिंकणारा पहिला यजमान राष्ट्र बनला.