आयडीएफसी बँकेचे नाव बदलून आयडीएफसी फर्स्ट बँक असे होणार

0
90

नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी कॅपिटल फर्स्ट सोबत आपल्या एकत्रीकरण नंतर 25 ऑक्टोबर 2018 रोजी आयडीएफसी बँकाने आपले नाव ‘आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड’ मध्ये बदलणे प्रस्तावित केले. आयडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या प्रस्तावास आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मंजुरीची आवश्यकता आहे. यानंतरही कंपनीच्या रजिस्ट्रार, शेअरहोल्डर्स आणि इतर भागधारकांसह सांविधिक किंवा नियामक प्राधिकरणांच्या मंजुरीची आवश्यकता असेल.

आयडीएफसी बँक
• आयडीएफसीने 2013 मध्ये बँकिंग परवान्यासाठी अर्ज केला होता आणि 2014 मध्ये रिझर्व्ह बँकेकडून तत्त्वतः मंजुरी मिळाली होती.
• 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृतपणे आयडीएफसी बँकेचे उद्घाटन केले.
• 1 ऑक्टोबर 2015 रोजी बँकेने आपले कार्य सुरु केले असून याचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि आयडीएफसी या एकीकृत इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीचा एक भाग बनली.

आयडीएफसी
• आयडीएफसी 30 जानेवारी 1997 रोजी स्थापन करण्यात आली. 2014 मध्ये ते एक नॉन-ऑपरेटिव्ह वित्तीय होल्डिंग कंपनी (NOFHC) म्हणून स्थापित झाले.
• आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार असलेल्या आयडीएफसीच्या पाच दुय्यम अंगभूत कंपन्या – आयडीएफसी बँक, आयडीएफसी एमएफ, आयडीएफसी अल्टरनेटिव्ह्ज, आयडीएफसी आयडीएफ आणि आयडीएफसी सिक्युरिटीज.