आनंदीबेन पटेल मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी

0
17

गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांच्याकडे सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.

आनंदीबेन पटेल

# आनंदीबेन पटेल (गुजराती: आनंदीबेन पटेल; जन्म: 21 नोव्हेंबर 1 9 41) या  भारतीय राजकारणी आहेत आणि गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहे. 1987 पासून ते भारतीय जनता पक्षाशी संलग्न आहेत. 

# नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकारी म्हणून २०१४ मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या आनंदीबेन या राज्यातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या होत्या. 

# तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर आनंदीबेन यांनी गुजरातचा कार्यभार स्वीकारला होता. २०१६ मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

# त्यांची नियुक्ती मध्यप्रदेशच्या राज्यपाल म्हणून करण्यात आली आहे. गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांच्याकडे मध्यप्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त भार होता तो आता कमी होणार आहे.