आंतरराष्ट्रीय वित्त केंद्रात जे. सागर असोसिएट्स

0
20

देशातील अग्रगण्य लॉ फर्म असलेल्या जे. सागर असोसिएट्सने (जेएसए) आपले कार्यालय अहमदाबाद येथील आंतरराष्ट्रीय वित्त केंद्रात (इंटरनॅशनल फायनान्स सेंटर किंवा आयएफएससी) सुरू केले आहे.

इंटरनॅशनल फायनान्स सेंटर किंवा आयएफएससी या केंद्रात कार्यालय सुरू करण्याचा मान मिळवणारी ही देशातील पहिली लॉ फर्म आहे. जीआयएफटी आयएफएससी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात कार्यालय सुरू केल्यामुळे जेएसएला वित्तसेवा क्षेत्रात चांगली कामगिरी करता येणार आहे.

कंपनीच्या मुंबई कार्यालयातील वरिष्ठ भागीदार अॅड. नितीन पोतदार हे जीआयएफटी आयएफएससी येथील कार्यालयाचे नेतृत्व करणार आहेत. विलिनीकरण, एकत्रिकरण या विषयातील ते तज्ज्ञ आहेत. जगभरातील संस्था, कंपन्या यांना भारतात व्यवसाय सुरू करणे किंवा त्यांचे एकत्रिकरण करणे यासाठी साह्य करण्याचा त्यांना दोन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे.