आंतरराष्ट्रीय वन दिन : 21 मार्च

0
54

दरवर्षीप्रमाणे 21 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय वन दिन (International Day of Forests) म्हणून साजरा केला गेला. यावर्षी हा दिवस “फॉरेस्ट्स अँड सस्टेनेबल सिटीज” या विषयाखाली साजरा केला गेला.

# आंतरराष्ट्रीय वन दिनाच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या वन प्रदेशाचे व झाडांचे महत्त्व याविषयी जागृती निर्माण केली जाते तसेच लोकांचा जीवन विकास, शाश्वत विकासाला चालना आणि हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी लाकूड ऊर्जेचे महत्त्व ठळक केले जाते.

# 21 डिसेंबर 2012 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेद्वारे एक ठराव मंजूर करून दरवर्षी 21 मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय वन दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.

भारतातली वनसंपत्ती 

# भारतामध्ये वनांसंबंधी सर्वात मोठी समस्या म्हणजे अपुरे आणि वेगाने कमी होत जाणारे वनक्षेत्र आहे. आधीच नमूद केल्याप्रमाणे, देशातील एकूण वनक्षेत्र अंदाजे 21% आहे, मात्र ते आवश्यकतेनुसार 33% हवे. लहान-मोठ्या वन उत्पादनांच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी वनक्षेत्राचे हे अगदी लहान प्रमाण देखील गंभीर बाब ठरते.

# भारतामध्ये बहुतेक वने संरक्षणात्मक दृष्टीने आहे आणि व्यावसायिक वनांची कमतरता आहे. पर्यावरणाचा र्‍हास याविषयी जागरुकता वाढविल्यामुळे आपल्याला वनसंपदा व्यावसायिक वस्तु म्हणून वागविण्याऐवजी पर्यावरणासाठी संरक्षणात्मक घटक म्हणून पाहणे भाग पाडले आहे.

# वनांच्या वाढीसंबंधी भारतात शास्त्रीय तंत्रांचीही कमतरता आहे. भारतात वनांची केवळ नैसर्गिक वाढ होते. त्यामुळे त्यांची वाढ मंद गतीने होते आणि ते खराब उत्पन्न देणारी असतात.