आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत अभिजीत सावंत प्रथम

0
21

दुबई येथे झालेल्या “आंतरराष्ट्रीय योगासन’ स्पर्धेमध्ये कुरवली (ता. इंदापूर) येथील अभिजीत सावंत या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावताना “उत्कृष्ट खेळाडू’ पुरस्कारावरही बाजी मारली.

# ‘आंतरराष्ट्रीय योगासन’ स्पर्धा दुबई येथे आयोजित करण्यात आली होती.

# यामध्ये भारत, दुबई, फिलिपाइन्स, नेपाळ अशा विविध देशातील स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता.

# यामध्ये 8 ते 14 वयोगटात अभिजीत सावंत व मिलींद गाडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक पटकविला. त्याचबरोबर 14 ते 18 या वयोगटात गौरव शेंडे व प्रथमेश काटे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

# या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संस्थापक आण्णासाहेब डांगे, सचिव चिमण डांगे, व्यवस्थापक सुनील शिनगारे, प्राचार्य सुभाष पाटील, मुख्याध्यापक महेश जाधव, क्रीडा मार्गदर्शक परेश पाटील, योगा शिक्षक सुशांत घोरपडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.