आंचलने रचला इतिहास

0
19

भारतात फारशा परिचित नसलेल्या स्किइंग स्पर्धेत आंचल ठाकूरने इतिहास रचला असून, या खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकावणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तुर्की येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आंचलने कांस्यपदकाची कमाई केली.

# हिमाचल प्रदेशातील मनाली येथल्या आंचल ठाकूर या २१ वर्षीय खेळाडूने देशासाठी पहिले आंतरराष्ट्रीय स्कीईंग स्पर्धेतले पदक मिळविले आहे.

# हा पराक्रम करणारी आंचल ठाकूर पहिलीच महिला आहे.

# तुर्कस्तानात नुकत्याच पार पडलेल्या फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल स्कीईंग तर्फे आयेाजित विश्व स्कीईग टूर्नामेंटमध्ये आंचल ने कांस्य पदकाची कमाई केली आहे.

स्कीइंग 

स्कीइंग हा बर्फावर खेळला जाणारा खेळ आहे. बर्फावरून वेगाने स्कीज्च्या मदतीने पुढे जावे लागते. स्कीज्बरोबर बूट वापरले जातात, जे  स्कीज्ला जोडता येतात.एल्पाईन स्किइंगमध्ये डोंगरावरून वेगाने पुढे यावे लागते.