अली एलीयव टूर्नामेंटमध्ये बजरंग पुनियाने सुवर्णपदक पटकावले

0
21

2 मे 2019 रोजी जगातील पहिल्या क्रमांकावरील बजरंग पुनियाने रशियाच्या कास्पिस्कमध्ये 2019 मधील अली एलीयव रेसलिंग टूर्नामेंटमध्ये पुरुष 65 कि.ग्रा. फ्रीस्टाईलच्या फाइनलमध्ये व्हिक्टर रसादिनला 13-8 ने पराभव करून सुवर्ण पदक जिंकले.

• मागील दोन आठवड्यात हे पुनियाचे दुसरे पदक आहे.
• यापूर्वी 23 एप्रिल रोजी बजरंगने चीनच्या शीआन मधील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपच्या फाइनलमध्ये कझाकिस्तानच्या सयातेबक ओकासोव्हला 12-7 ने पराभूत केले होते.
• अलीकडेच, 29 एप्रिल 2019 रोजी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (डब्ल्यूएफआय) बजरंग पुनियाची भारताचे सर्वोच्च क्रीडा सन्मान, राजीव गांधी खेल रत्नसाठी शिफारस केली आहे.

न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये पुनियाचा सामना :

• 6 मे, 2019 रोजी बजरंगची “ग्रॅपल एट द गार्डन” बीट द स्ट्रीट्स या न्यू यॉर्क येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे होणाऱ्या लढतमध्ये सहभाग घेणार आहे.
• न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये 2010 पासून आयोजित होणारा बीट द स्ट्रीट्स या आंतरराष्ट्रीय कुस्तीसाठीच्या प्रमुख इव्हेंटमध्ये लढणारा बजरंग पुनिया पहिला भारतीय कुस्तीपटू असेल.
• पुनियाचा सामना दोन वेळा यूएस राष्ट्रीय चॅम्पियन यियानी डायकोमाहलिस याच्याशी होईल.
• अमेरिकेतील कुस्तीसाठी राष्ट्रीय शासकीय संस्था यूएसए रेसलिंग यांनी पुनियाला निमंत्रित केले होते.

बजरंग पुनिया :

• पुनियाने सात वर्षांच्या वयात कुस्ती खेळण्यास सुरुवात केली आणि त्याच्या वडिलांनी यात त्याला प्रोत्साहन दिले.
• 2015 मध्ये त्याचे कुटुंब झज्जर येथून सोनीपत येथे स्थायिक झाले जेणेकरून बजरंग भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे क्षेत्रीय केंद्र येथे आपल्या खेळाचा अभ्यास करू शकेल.
• 2013 मध्ये वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 60 किलो श्रेणीमध्ये कांस्य पदक जिंकले होते.
• 2014 च्या ग्लासगो, स्कॉटलंडमधील कॉमन वेल्थ गेम्समध्ये त्याने कॅनडाच्या डेव्हिड ट्रेंबले याला 1-4 ने पराभूत केल्यानंतर पुरुष फ्रीस्टाइल 61 किलो श्रेणीमध्ये रौप्य पदक जिंकले होते.
• दक्षिण कोरियाच्या इंचियनमधील 2014 एशियन गेम्समध्ये ईरानच्या मसूद एस्मेलपॉरच्या हाती 1-3 ने पराभूत झाल्यानंतर पुरुष फ्रीस्टाइल 61 किलो श्रेणीत रौप्य पदक जिंकले होते.
• कझाकिस्तानच्या अस्थाना येथे 2014 मधील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये पुनियाने पुरुषांच्या फ्रीस्टाइल 61 किलो वर्गात इरानच्या मसूद एस्मेलपॉरच्या हाती पराभूत झाल्यानंतर रौप्य पदक जिंकले होते.
• त्यानंतर त्याने 2017 मध्ये दिल्ली येथे आयोजित आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.
• ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे झालेल्या 2018 राष्ट्रकुल खेळामध्ये पुरुष फ्रीस्टाइल 65 किलोग्राम श्रेणीत सुवर्ण जिंकले.
• 2018 एशियन गेम्समध्ये त्याने पुरुषांच्या फ्रीस्टाइल 65 किलोग्राम श्रेणीतील सुवर्णपदक पटकावले.
• 2018 च्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्यपदक पटकावले. या रौप्य पदकानंतर त्याने जागतिक क्रमवारीत 65 kg श्रेणीमध्ये प्रथम स्थान पटकावले.
• चीनच्या शीआन येथे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2019 मध्ये सुवर्ण जिंकल्यानंतर त्याने आशियावर आपला अधिकार गाठला.