अयोध्या दीपोत्सवाची ‘गिनीज’मध्ये नोंद

0
180

अयोध्या येथे झालेल्या दीपोत्सवाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे. शरयू नदीच्या काठावर झालेल्या या दीपोत्सवात तब्बल 3 लाखांहून अधिक दिवे लावण्यात आले. या दीपोत्सवात दक्षिण कोरियाच्या ‘फर्स्ट लेडी’ किम जुंग सूक या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

उत्तरप्रदेशात हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. शरयू नदीच्या काठावर तब्बल 3, 01, 152 दिव्यांची आरास लावण्यात आली. ‘अयोध्या दीपोत्सव 2018’ या दीपोत्सवाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. 

दरम्यान, या दीपोत्सव कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या केले.