अमेरिकेमध्ये अंतर्देशीय प्रवासासाठी पासपोर्ट नेणे बंधनकारक

0
12

अमेरिकेतील सर्व नागरिकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये प्रवास करण्यासाठी ओळख प्रमाणपत्राची गरज होती. या मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, किंवा निवासी ओळखपत्र अथवा ग्रीन कार्ड ही कागदपत्रे आवश्यक असत. पासपोर्ट ची गरज ही केवळ देशाच्या बाहेर प्रवास करतानाच पडत असे. पण आता अमेरिकेतील नागरिकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जायचे असल्यास (अंतर्देशीय प्रवास) ही पासपोर्ट नेणे बंधनकारक असणार आहे.

# अमेरिकेतील सर्व नागरिकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये प्रवास करण्यासाठी ओळख प्रमाणपत्राची गरज होती. या मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, किंवा निवासी ओळखपत्र अथवा ग्रीन कार्ड ही कागदपत्रे आवश्यक असत. पासपोर्ट ची गरज ही केवळ देशाच्या बाहेर प्रवास करतानाच पडत असे. पण आता अमेरिकेतील नागरिकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जायचे असल्यास (अंतर्देशीय प्रवास) ही पासपोर्ट नेणे बंधनकारक असणार आहे.

# या संबंधीचा कायदा २००५ साली अमेरिकन कॉन्ग्रेसने पारित केला होता. या कायद्याला ‘ द रियल आय डी अॅक्ट ‘ असे नाव दिले गेले आहे.

# सप्टेंबर २०११ मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर वर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यानंतर, अमेरिकेतील गृहसंरक्षण खात्याने या कायद्याची शिफारस करीत हा कायदा अधिक काटेकोर सुरक्षा नियमांसह लागू केला जावा अशी सूचना केली होती.

# या कायद्या अंतर्गत, नागरिकांना सरकारी ओळखपत्रे देताना पाळावयाचे सुरक्षा नियम बनविले गेले आहेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र देताना या नियमांच्या चौकटीअंतर्गतच ते दिले जाते.

# नागरिकांचा पासपोर्ट देखील या कायद्याच्या अंतर्गत दिल्या गेलेल्या सूचनांप्रमाणे असून, ज्या राज्यांनी हे नियम लागू करून पासपोर्ट उपलब्ध करून दिले आहेत, केवळ त्याच राज्यांमधील नागरिकांना अंतर्देशीय विमान प्रवास करण्यास अनुमती दिली जाणार आहे.

# तसेच कोणत्याही सरकारी विभागामध्ये किंवा अणुसंशोधन केंद्रामध्ये प्रवेश करण्यासाठीही नवीन नियमांप्रमाणे बनविल्या गेलेल्या ओळखपत्रे असणे बंधनकारक असणार आहे.