अमेरिकेकडून आठ देशांना इराणचे तेल घेण्याची सवलत

0
174

इराणविरोधात 5 नोव्हेंबर, 2018 पासून नव्याने लागू होत असलेल्या निर्बंधात भारतासह आठ देशांना इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याची सवलत देण्याचे अमेरिकेने मान्य केले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची संपूर्ण कोंडी करण्यासाठी हे निर्बंध लावले आहेत. इराणकडून तेल खरेदी पूर्णतः थांबविण्याचे निर्देश अमरीकी प्रशासनाने जगभरातील देशांना दिले होते. परंतु इराणकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या भारतासारख्या काही देशांनी याला आक्षेप घेतला होता. कारण भारताच्या कच्च्या तेलाच्या एकूण वापरत जवळजवळ 80% आयात केले जाते.
इराणकडील तेलखरेदी बंद केल्यास जगभरात कच्च्या तेलाच्या किमती एकदमच वाढतील. त्यामुळे याचा तात्पुरता मार्ग म्हणून ट्रम्प प्रशासनाने आठ देशांना इराणकडून तेल खरेदीची सवलत दिली आहे.
भारतासह जपान व दक्षिण कोरिया यांचा या देशांत समावेश आहे. चीन हा इराणी तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे. चीनला तेल आयातीची सवलत मिळाली असली तरी अटींच्या मुद्यावर दोन्ही देशांत अजून चर्चा सुरु आहे.
इतर चार देश कोणते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ही सवलत तात्पुरती असणार आहे.