अमेरिका, महाराष्ट्रात तीन करार

0
41

द यूएस-इंडिया स्टेट अँड अर्बन इनिशिएटिव्हच्या माध्यमातून अमेरिका व महाराष्ट्र सरकारमध्ये तीन वेगवेगळ्या क्षेत्रांसंबधीच्या करारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या अमेरिका दौऱ्यात वॉशिंग्टन येथे हे करार करण्यात आले. यानुसार महाराष्ट्रातील उद्योग, तंत्रज्ञान, ऊर्जा, सार्वजनिक वाहतूक आदी क्षेत्रांत राज्याला अमेरिकेचे सहकार्य मिळणार आहे.

महाराष्ट्रातील उद्योग व तंत्रज्ञानपुरक वातावरणास अधिक चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकार व नेटवर्क फॉर ग्लोबल इनोव्हेशन यांच्यात एक महत्त्वपूर्ण करार झाला. दीर्घकाळ चालणाऱ्या तंत्रज्ञानाच्या वापरात वाढ करणे, तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करणे, व्यापार-उद्योगांच्या वाढीस प्रोत्साहन देणे आदी या कराराची उद्दिष्टे असून नियोजन, अर्थपुरवठा, प्रकल्प उभारणी यासाठी सहकार्य केले जाणार आहे.