अभिजित कटकेला सुवर्णपदक

0
383

हरयाणाच्या मल्लांनी २३ वर्षांखालील वयोगटाच्या फ्री स्टाइल टाटा मोटर्स राष्ट्रीय कुस्ती स्पध्रेवर वर्चस्व गाजवले असले, तरी अभिजित कटकेच्या सुवर्णपदकासह आणखी तीन रौप्यपदके कमावत महाराष्ट्राने छाप पाडली. महाराष्ट्राने एकूण १३९ गुणांसह तिसरे स्थान संपादन केले.

१२५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत अभिजितने सेनादलाच्या संजयचा ७-२ असा पाडाव करून सुवर्णपदक पटकावले. ७४ किलो गटाच्या अंतिम सामन्यात हरयाणाच्या प्रवीणने महाराष्ट्राच्या कुमार शेलारला १५-३ अशा फरकाने नामोहरम केले. ६५ किलो गटात दिल्लीच्या सुरजीतने अक्षय हिरगुडेला पराभूत केले, तर ५७ किलो गटात दिल्लीच्या रवी कुमारने महाराष्ट्राच्या सागर मारकडचा १०-४ असा पराभव केला. या स्पध्रेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या मल्लांना १२ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत रोमानिया येथे होणाऱ्या २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.