अनुष्का शर्मा फोर्ब्सच्या यादीत

0
20

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला फोर्ब्स ’30 अंडर 30 आशिया’च्या 2018 च्या यादीत स्थान मिळाले आहे. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे कार्य करणाऱ्या लोकांनाच या यादीत स्थान देण्यात आले आहे.

# बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला फोर्ब्स ’30 अंडर 30 आशिया’च्या 2018 च्या यादीत स्थान मिळाले आहे. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे कार्य करणाऱ्या लोकांनाच या यादीत स्थान देण्यात आले आहे.

# ‘फोर्ब्स’ने दहा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आशियाला पुढे नेणार्‍या तीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या तीनशेजणांची ही यादी बनवली आहे.

# ‘फोर्ब्स’ने तिसर्‍यांदा ही यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये 24 आशियाई देशांमधील तरुण-तरुणींना समाविष्ट केले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिचे नावही यामध्ये आहे.

# अनुष्काने 2007 मध्ये मॉडेलिंगच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 2008 मध्ये तिने ‘रबने बना दी जोडी’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

# ‘बँड बाजा बारात’, ‘दिल धडकने दो’,‘सुल्तान’,‘ऐ दिल है मुश्किल’, ‘पीके’,‘जब तक है जान’ हे तिचे गाजलेले काही चित्रपट. 2015 मध्ये तिने ‘क्‍लीन स्लेट फिल्म्स’ हे आपले प्रॉडक्शन हाऊस सुरू केले.

# फोर्ब्सच्या यादीत 300 लोकांना स्थान देण्यात आले असून यात 24 देशांनी सहभाग नोंदवला होता.

फोर्ब्स 
 
फोर्ब्स मॅग्झिनची स्थापना 17 सप्टेंबर 1917 रोजी झाली होती. बी. सी. फोर्ब्स आणि वॉल्टर ड्रे याचे फाऊंडर मेम्बर होते. फोर्ब्स हे बिझनेस जर्नलिस्ट होते.